पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.२२) कोरोनाने ४० वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने बळींची संख्या तीन झाली आहे. तर शहरात नव्या ३ रुग्णांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाच्या रूग्णांची संख्या ६७ वर पोहचली आहे. दरम्यान दोन रूग्ण पूर्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली.
वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहिती नुसार आज मृत झालेली ४० वर्षीय महिला ही मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे येथे राहणारी होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कै.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कोवीड-१९ आजाराच्या उपचाराकरिता दाखल असताना तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले ३ रुग्ण हे दापोडी, वाकड व मार्केट यार्ड गुलटेकडी पुणे या परिसरातील आहेत. त्यांच्यावर वायसीएम रूग्णालयत उपचार सुरू आहेत.
तसेच थेरगांव आणि खराळवाडी येथील रहिवासी असलेले २ कोविड -१९ बाधीत दोन रुग्ण वायसीएम रुग्णालय येथे दाखल होते. यांची दोन्ही कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आलेले आहे.
पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज
बुधवार दि.२२ एप्रिल २०२०, अपडेट्स सायं. ७.०० वाजेपर्यंतचे
🟪 आज दाखल झालेले संशयित रूग्ण = ८१
🟩 आज तपासणीत निगेटिव्ह आलेले रूग्ण = ७०
🟥 सध्या कोरोना बाधित रूग्ण = ४४(३६ रूग्ण वायसीएममध्ये तर उर्वरित रूग्ण पुण्यातील रूग्णालयात)
🟨 कोरोना मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या = २० (आज २ रूग्ण कोरोना मुक्त)
🟦 आज वाढ झालेल्या बाधित रूग्णांची संख्या = ०३
🟧 प्रतिक्षेतील अहवाल = ८१
⬛ आजपर्यंत मृत रूग्णांची संख्या = ०३(आज ०१ मृत)
🟫 होम क्वारंटाईन नागरिकांची एकूण संख्या = ३०२३
🚨 आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्या = ६७
♒ दैनंदिन सर्व्हेक्षण केलेली लोकसंख्या = ५९,७७४
😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE😷
Source – PCMC Health Dept.






















Join Our Whatsapp Group