पिंपरी (Pclive7.com):- राज्यावर आलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण मदतकार्य सुरू आहे. अशा परिस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे रहात असलेल्या यशराज विलास नढे या विद्यार्थ्याने राज्य सरकारला मदतीचा एक हात दिला आहे. या विद्यार्थ्याने १० वीत मिळवलेल्या यशाच्या शिष्यवृत्तीची १० हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.

काळेवाडी येथे रहात असलेला यशराज विलास नढे हा ११ वी चा विद्यार्थी आहे. त्याने दहावीच्या परिक्षेत मिळालेल्या यशाबद्दल शिष्यवृत्ती मिळाली होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. यशराज याचाही महापालिकेकडून १० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला होता. सध्या कोरोनाने देशात व राज्यात धुमाकूळ घातला आहे. सदर आजाराचा राज्य सरकार सामना करत आहे. त्यासाठी हातभार म्हणून यशराज याने त्याला मिळालेली शिष्यवृत्तीची संपुर्ण रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.






















Join Our Whatsapp Group