पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडकरांना धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. निगडी रुपीनगर परिसरातील तब्बल १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये सात पुरुष, तीन महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज (दि.२४) सकाळी रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचा आकडा ५६ वर पोहचला आहे. आजपर्यंत ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आज निगडी ओटास्किम येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून बळींची संख्या ४ झाली आहे.
निगडी रुपीनगर परिसरातील एका २६ वर्षाच्या तरुणाचे कोरोनाचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटीव्ह आले होते. त्याच्या संपर्कातील २५ जणांना महापालिका रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे रिपोर्ट आज सकाळी आले आहेत. त्यामध्ये १२ जण पॉझिटिव्ह आहेत. त्यामध्ये सात पुरुष असून त्यांचे वय १८,२२, २४, २६, २८, ३५, ६० वर्षे इतके आहे. तर २०, २६, २८ वर्षाच्या तीन महिला आणि ३ वर्षाच्या दोन मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






















Join Our Whatsapp Group