पिंपरी (Pclive7.com):- कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात लॉकाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आलीयं. संकटाच्या या परिस्थितीत शहरातील अनेक दानशूर व्यक्ती तसेच संस्था या गरजूंच्या मदतीला धावून गेले आहेत. थेरगाव सोशल फाउंडेशनने देखील अखंडपणे जनसेवेचे कार्य गेल्या ३३ दिवसांपासून सुरू ठेवले आहे. थेरगाव, वाकड, रहाटणी काळेवाडी परिसरातील हजारों गरजू नागरिकांसाठी या सोशल फाउंडेशन दररोज अन्नदानाची अविरत सेवा सुरू ठेवले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोरोना या महामारीने संपूर्ण देशावर हल्ला चढवला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळत आहे. आजअखेर ६९ रुग्ण शहरात आढळले आहेत. महापालिका प्रशासन या संकटाचा खंबीरपणे सामना करत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी लॉकडाऊनला सुरुवात झाली होती. तेव्हापासून थेरगाव सोशल फाउंडेशन या संस्थेने अखंड जनसेवेचा एक आदर्श सर्वांपुढे उभा केला आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून दररोज हजारो लोकांना अन्नदान केले जाते. आज या कार्याला सलग ३३ दिवस पूर्ण झाले आहेत.
कोरोनामुळे थेरगाव व आजुबाजुच्या परिसरात अडकुन पडलेले विद्यार्थी आणि कामगार वर्गाला थेरगाव सोशल फाऊंडेशनतर्फे अन्नदान सुरु आहे. या फाऊंडेशनने ३ मेपर्यंत थेरगाव मध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही असा निर्धार केलायं. या फाऊंडेशनवर प्रेम कराणारे त्यांचे मित्र आणि हिंतचिंतक जमेल तशी सर्वतोपरी मदत करत आहेत. तसेच सर्व सदस्य जमेल तसा अन्नदानासाठी वेळ देत आहेत. येथे उभारण्यात आलेल्या अन्नछत्रावर गर्दी होऊ नये म्हणुन सोशल डिस्टसिंगचे पांढरे वर्तुळ आखण्यात आलेले आहेत. सर्व सभासद स्वतःहुन याची काळजी घेत आहेत. अन्नछत्रावर वाढती गर्दी पाहता कोणालाही विषाणुची लागण होऊ नये म्हणुन सॅनिटायझर कक्षाची उभारणी केलेली आहे. तसेच या सोशल फाऊंडेशनच्या सदस्यांनी आजही अपंग वयोवृध्द लोकांना त्यांच्या घरी जाऊन डबे पोहोचविण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. म्हणूनच थेरगाव सोशल फाऊंडेशनमधील प्रत्येक सदस्याला पिंपरी चिंचवड लाईव्ह न्यूज (Pclive7.com) चा मानाचा मुजरा..!























Join Our Whatsapp Group