पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपमहापौर विष्णू गुलाब कांबळे वय (७८) यांचे काल दुपारी पदीर्घ आजाराने दुखःद निधन झाले. ते मूळ चे चौबे पिंपरी, जिल्हा सोलापूर येथे १९४३ साली जन्मले व नोकरी कामा निमित्त पिंपरी चिंचवड शहरात आले त्यांनी एसकेएफ कंपनीमध्ये नोकरी केली.
१९८६ ते ९२ या काळात नगरसेवक पदावर निवडून आले, त्यांना महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार देण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षण मंडळाचे सदस्य, अध्यक्ष गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे, स्थायी समिती सदस्य अशा पदांवर त्यांनी काम केले होते. त्यांच्या कार्यकाळात चिंचवड येथे प्रेक्षाग्रह उभारण्यात आले, तेच आजचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आहे.
शिवशंकर सेवाभावी चारीटेबल ट्रस्टचे संस्थापक व विजय शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरचे संस्थापक होते, त्यांच्या मागे पत्नी दोन मुले तीन मुली जावई नातवंडे असा परिवार आहे. एन.एस. यु.आय. (विद्यार्थी काँग्रेस) चे माजी प्रदेशाध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मनोज कांबळे यांचे ते वडील होते.






















Join Our Whatsapp Group