पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये एक वर्षीय चिमुकल्याला कोरोनाची बाधा झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. आज आलेल्या अहवालात एकून चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात या चिमुकल्याचा समावेश आहे. तर खडकी येथील ५० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. आत्तापर्यंत ३१ जण कोरोनामुक्त झालेले असून शहरातील कोरोना बाधितांची संख्या ११० वर पोहचली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत ३१ जण कोरोनामुक्त झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणू शहरात थैमान घालत असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आज चार जण कोरोना बाधित आढळले असून यात एक वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. इतर कोरोना बाधितांची वय ९, १९ आणि ३० अशी आहेत. हे सर्व थेरगाव, रुपीनगर देहूरोड, रविवार पेठ, पुणे स्टेशन येथील आहेत.
दरम्यान, खडकी येथील ५० वर्षीय महिलेवर गेल्या काही दिवसांपासून महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ३ तर इतर परिसरातील २ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. याशिवाय, पिंपरी चिंचवडच्या हद्दी बाहेरील ४ जणांचे अहवालही पॉझिटिव्ह आलेले आहेत.






















Join Our Whatsapp Group