पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकटात अनेक दानशूर व्यक्तींनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. कासारवाडी मधील मातृभूमी प्रतिष्ठान व मातृभूमी ढोल ताशा पथकाने देखील प्रेरणादायी कार्य करत समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. गेल्या एक महिन्यापासून अविरतपणे गरजूंना अन्नदान सेवा त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.
कासारवाडी या प्रतिष्ठानच्या वतीने 27 मार्च पासून अन्नछत्र सेवा चालू करण्यात आले आहे. रोज गरजू लोकांना तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका साफसफाई कर्मचारी वर्ग आणि बँचलर विद्यार्थी, बांधकाम कामगार, गरीब नागरिक व लाॅकडाउनमुळे अडकून पडलेले नागरीक तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे असा कामगार वर्गाला या अन्नछत्राच्या माध्यमातून रोज सकाळी व संध्याकाळी प्रतिष्ठानतर्फे जेवण वाटप करण्यात येत आहे. रोज 900 ते 1000 लोक या अन्नदान सेवेचा लाभ घेत आहेत. आज गेली 30 दिवस ही सेवा अविरत पणे सकाळ सकाळी व संध्याकाळी चालू आहे. आजपर्यंत प्रतिष्ठाणच्या माध्यमातून 22 हजार लोकांना अन्नदान करण्यात आले आहे. अजूनही जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोचवण्याचं प्रयत्न आहे.
दिनांक 27 मार्च पासून सुरु झालेली ही सेवा लॉकडाऊन पूर्ण होई पर्यंत दुपारी आणि संध्याकाळी अशी अखंडितपणे चालू राहणार आहे. अन्नछत्र सेवेच्या माध्यमातून रोज वेगवेगळे पदार्थ देण्यात येतात. त्यात मसाला भात, पुलाव, डाळ खिचडी, लाप्शी, सोयाबीन पुलाव, चपाती भाजी, पुरी भाजी, पिठल भाकरी, सांबर भात याचा समावेश असतो. जेवणा सोबतच किराणाच्या किटचे ही 70 ते 80 कुटुंबाला वाटप करण्यात आले आहे. त्यासोबतच भोसरी पोलिस स्टेशनला सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
या अन्नदान उपक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत कडदेकर, विवेक कन्नलू, अतुल दौंडकर, चेतन मेस्ता, यशवंत गंभीरे, नारायण काका मेस्ता, जयदीप साने, गजानन धावडे, अजय शिंदे, दर्शन धावडे, कौस्तुभ कुलकर्णी, अमित दौंडकर, मीरा कुलकर्णी, गीता मेस्ता यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच समाजातील अनेक दानशुर लोकांनी या कार्यात हातभार लावला आहे. ज्या व्यक्तीला जेवणाची गरज आहे त्यांनी मातृभूमी प्रतिष्ठानशी संपर्क साधावा. सदर सेवा कासारवाडी, शंकरवाडी, नाशिक फाटा, कुंदननगर, फुगेवाडी भागात राबविण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group