नवी दिल्ली (Pclive7.com):- कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनची मुदत ३ मे रोजी संपणार आहे. मात्र, त्यापुर्वीच मोदी सरकारनं लॉकडाऊनची मुदत आणखी १५ दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना भारतीयांना करावा लागणार आहे.
आताच मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आज मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांशी ३ मे नंतरच्या परिस्थितीची रणनिती ठरवली. आणि आताच मोदी सरकारनं आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार १७ मे पर्यंत लॉकडाऊन चालु राहणार आहे.






















Join Our Whatsapp Group