पिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूने देशभर थैमान घातले आहे. यामुळे संपुर्ण भारतामध्ये लाॅकडाऊन जाहीर झाले आहे. त्यामध्ये पोलीस कर्मचारी देवदूत सारखं कार्य करीत आहेत. आज दापोडीत बंदोबस्ताला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी पिंपरी युवासेनेकडून मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.
यावेळी पिंपरी युवासेनेचे विभाग संघटक निलेश हाके, ए.पी.आय.दीपाली मोरे आशिर्वाद महिलाच्या शीला जाधव, पोलीस कर्मचारी युवराज टेकवडे, अमर पोळके, दीपक धीवार, नंदूभाऊ काची, गोरख नेटके, संतोष आढाव, उपस्थित होते.