नवी दिल्ली (वृत्तसंस्था):- लॉकडाऊनच्या तिसरा टप्प्यात आजपासून सुरु होत असतानाच गेल्या २४ तासात देशभरात पुन्हा अडीच हजारांहून अधिक नवीन कोरोना बाधित आढळून आले. सोमवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात तब्बल २ हजार ५५३ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे देशभरातील कोरोना बाधितांची संख्या ४२ हजार ५३३ इतकी झाली आहे. त्यापैकी २९ हजार ४५३ हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशात गेल्या २४ तासात तब्बल ७२ जणांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत १ हजार ३७३ कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे. देशात रविवारी प्रथम १ हजार ७४ कोरोनाबाधित संसर्गातून मुक्त होऊन घरी गेले आहेत. देशात आतापर्यंत ११ हजार ७०७ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत.
लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये केंद्र सरकारने सवलती जाहीर केल्या आहेत.
सेच रेड झोनमध्येही आता काही सवलती जाहीर केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरु होणार आहे. त्यामुळे ग्रीन व आरेंज झोनमध्ये रेड झोनमधील नागरिक येणार नाहीत व त्यांच्याकडून कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही ना याची काळजी घेण्याची मोठी आवश्यकता आहे.






















Join Our Whatsapp Group