पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस करोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील २१ हे भाग ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर केले आहेत. याबाबत आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढले असून त्याद्वारे या परिसरांना कंटनमेंट म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज रात्री १२ वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत या २१ परिसरातील नागरिकांना बाहेर पडता येणार नसून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला या परिसरात प्रवेश करता येणार नाही. करोनाचा संभाव्य सामुदायिक प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे. या परिसरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही १० ते १२ या दोन तासांच्या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत.
परंतु कंटनेमेंट झोन व्यतिरिक्त उर्वरित भागात भाजीपाला आणि किराणा दुकाने सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान आणि दूध विक्री सकाळी सहा ते सायंकाळी सहा दरम्यान सरु राहणार आहे. तर बॅंकांचे कामकाजही १० ते २ या वेळेत सुरू राहणार आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना कंटेनमेंट झोन परिसरात प्रवेश करता येणार आहे. आज जाहीर करण्यात आलेले कंटेनमेंट झोन पुढीलप्रमाणे.
‘कंटेनमेंट झोन’चा परिसर खालील प्रमाणे
०१) खराळवाडी परिसर – पिंपरी जामा मस्जिद, खराळवाडीतील गिरमे हॉस्पिटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिधा ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी, खराळ आई गार्डन, ओम हॉस्पिटल, सिटी प्राईड हॉटल, गिरमे हॉस्पिटल
०२) पीएमटी चौक, भोसरी – पाटील हॉस्पिटल, मारुती मंदिर, पीसीएमसी पाणी टाकी, भोसरी जुने हॉस्पिटल, विश्वविलास बिर्याणी हाऊस.
०३) गुरुदत्त कॉलनी, भोसरी- भोसरी- आळंदी रोड, बिकानेर स्वीटस्, बालाजी मंदिर, भारत पेट्रोल पंप, दुर्वांकुर लॉन मागील परिसर, महा-ई सेवा केंद्र, आनंद हॉस्पिटल,
०४) रामराज्य प्लॅनेट, कासारवाडी – सीएमई हद्द, सेवन ऍप्पल हॉटेल, सिद्धार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस.
०५) गणेश नगर, दापोडी- पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दी टॉवर्स, शितलादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यू मिलेनियम इंग्लिश स्कुल.
०६) शास्त्री चौक, भोसरी- संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, परफेक्ट इलेक्ट्रिल, व्यंकटेश मेडिकल, महानगर को – ऑप. बॅंक, भोसरी
०७) तनिष्क ऑर्किड, चऱ्होली – तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द
०८) कृष्णराज कॉलनी, पिंपळे गुरव – पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी.
०९) नेहरुनगर बस डेपो – जनता सहकारी बॅंक, नूरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबादी बिर्यानी हाऊस.
१०) कावेरीनगर पोलिस लाइन – बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज, अण्णाभाऊ साठे नगर.
११) रुपीनगर – तळवडे – दिपक ग्लास सेंटर, स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती – शक्ती बस डेपो .
१२) गंधर्वनगरी परिसर, मोशी – जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सूर्योदय, मोशी कचरा डेपो, पुणे नाशिक हायवे.
१३) विजयनगर परिसर, दिघी – शिवशंकर आपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड,
१४) तनिष्क आयकॉन परिसर, दिघी – पाण्याची टाकी, कृष्ण आंगण कॉमप्लेक्स, ओम साई मिसळ, आळंदी रोड, सुदामा भेळ.
१५) मधुबन सोसायटी परिसर, जुनी सांगवी – मुळा नदी, सीक्यूएई परिसर, कामटे फुड्स, गणेश मंदिर, इंडियन ऑईल पेट्रोल पंप.
१६) तपोवन रोड परिसर , पिंपरी वाघेरे – सुखवानी सिटी, व्होडाफोन स्टोअर, कापसे चौक , वाडेकर मिसळ.
१७) 16 नंबर बसस्टॉप परिसर, थेरगाव- औंध रावेत बीआरटी रोड, प्रोबस सॉफ्टवेअर प्रा. लि., अक्षय पार्क सोसायटी , प्रेम कुल्फी सेंटर.
१८) शिवाजी चौक परिसर, पिंपळे निलख – एस. एस. फर्निचर, गुरुदत्त मेडीकल, बाबुराव कामठे चौक, पाण्याची टाकी, बाबसाहेब आंबेडकर पथ.
१९) इंदिरा नगर परिसर, चिंचवड – बीएसएनएल स्टाफ कॉर्टर भिंत, महिंद्रा टू व्हीलर, सरस्वती को-ऑप. बॅंक, डबल ट्री हिल्टन, कॉर्पोरेशन बॅंक, एएसएमएस कॉलेज, सायन्स पार्कच्या मागील बाजू.
२०) शुभश्री रो हाऊस परिसर, पिंपळे सौदागर – कुणाल आयकॉन रोड, एमएसईबी ऑफिस, ओम दत्तराज मंदिर, रोज वुड सोसायटी, ओमचैतन्य डेअरी, पकवान स्विटस.
२१) साठ फुटी रोड, पिंपळे गुरव- तुळजा भवानी मंदिर, भालचंद्र हॉस्पिटल, निलम सुपर, गणेश मंदिर, माऊली हॉटेल, श्रीगणेश डेअरी, जयश्री स्वीटस.






















Join Our Whatsapp Group