पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी प्रभाग ११ कृष्णानगर मधील नागरिकांशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’व्दारे संवाद साधला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एकनाथ पवार यांनी नागरिकांच्या समस्या तसेच कोरोना विषाणूच्या लढ्यात घ्यावयाची काळजी व उपाययोजना या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शनाकरिता ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’चे आयोजन केले होते.
या आयोजित मिटिंगमध्ये नागरिकांनी भाजी मंडई, दारूचे दुकान, दैनंदिन समस्या व इतर अनेक प्रश्न नागरिकांनी मांडले. त्यावर प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नाला एकनाथ पवार यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तर देत नागरिकांचे समाधान केले. व सर्वांनी शासनाच्या नियम व अटींची पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान केले. शहरात प्रथमच एखाद्या लोकप्रतिनिधींनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला आहे. या आयोजनाबद्दल नागरिकांनी एकनाथ पवार यांचे आभार मानले.






















Join Our Whatsapp Group