पिंपरी (Pclive7.com):- दारूविक्री बंद आहे.. कुठे चाललास? अशी विचारणा केल्याच्या कारणावरून पिंपरी चिंचवडमधील काळेवाडीत हाणामारी झाली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक उर्फ विकी सुरेश नाईक (वय २२) आणि आयुब चाँद शेख (वय ३०, दोघे रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.
आयुब शेख, इम्रान शेख आणि उस्मान शेख, विनायक नाईक आणि संगिता सुरेश नाईक (वय ४६) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळू वाघमारे हा कॉलनीतून जात असताना उस्मान याने त्याला रस्त्यात अडविले आणि दारूविक्री बंद आहे, कुठे चाललास, अशी विचारणा केली. याचा जाब विचारण्यासाठी विनायक आणि त्याची आई संगिता हे गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे दोघे मायलेक पोलीसात तक्रार करण्यासाठी जात असताना आरोपी आयुब आणि इम्रानने त्यांना कडाप्पा व गट्टूने मारहाण केली. तसेच घराच्या खिडकीची काच फोडून नुकसान केले. तर विनायकने आयुबच्या डोक्यात दांडके मारून त्याला जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे पुढील तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group