पिंपरी (Pclive7.com):- स्व.सुमन उर्फ सिसेलिया अँथोनी पॉल यांच्या स्मरणार्थ पिंपरीतील गरजूंना अल्पोपहार वाटप करण्यात आले. भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि मागासवर्गीय समाज महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष संदीप कांबळे (गुरुजी) यांच्या हस्ते या अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
चीनमधून फैलावलेल्या कोरोना या विषाणूने देशात थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरिबांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही भागात गोरगरीब, साफसफाई कामगार वर्ग, सिक्युरिटी गार्ड आणि गरजू लोकांना भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या वतीने संदीप कांबळे यांनी अल्पोपहार वाटप केला. या लॉकडाऊनच्या सुरूवातीपासून संदीप कांबळे यांनी गरजूंना सदैव मदतीचा हात दिला आहे. त्याच्या या प्रेरणादायी कार्याचा आदर्श आज समाजाने घेण्याची गरज आहे.






















Join Our Whatsapp Group