मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्रात आज १३६२ नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची महाराष्ट्रातली संख्या १८ हजार १२० झाली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात महाराष्ट्रात आज कालपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या १८ हजार १२० झाली आहे.
१०० लोक जर वाढले तर २५ लोकांना डिस्चार्ज दिला जातोय. लक्षणं नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे साधारण ७३ टक्के असतात अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली. अमेरिकेत १० लाख लोकांमध्ये ४ हजार लोक हे करोना पॉझिटिव्ह आढळतात. त्याचप्रमाणे इटलीतही अशाच प्रकारे रुग्ण आढळतात. यु. के. मध्ये हे १० लाख लोकांमध्ये २७०० रुग्ण आढळतात. तर भारतात हे प्रमाण १० लाखांमध्ये ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळतात.
या देशांमध्ये मृत्यूचं प्रमाण जर पाहिलं तर १० लाख लोकांमध्ये ४००, ३०० असं आहे. मात्र भारतात १० लाख लोकांमध्ये १ मृत्यू कोरोनामुळे होतो असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सर्वसाधारण परिस्थिती पाहिली, तर आजही कोरोनाचा प्रादुर्भाव हा नियंत्रणात आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत, मात्र काळजीचं कारण नाही. आपल्याला अधिक सतर्क रहावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईतल्या धारावीत आज नवे ५० रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे धारावीतली रुग्णसंख्या ७८३ झाली आहे. आज धारावीत एक मृत्यू झाला आहे. धारावीत आत्तापर्यंत कोरोनाची लागण होऊन २१ जणांचा मृत्यू झाला आहे.






















Join Our Whatsapp Group