पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र. १२ रूपीनगर- तळवडे परिसरातील स्टॉर्म वॉटर लाईनचे चेंबर तसेच नाल्यामध्ये माती व कचरा पडल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भिती असल्यामुळे पावसाळ्यापूर्वीच रूपीनगर-तळवडे मधील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करून घेण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास बिरादार यांनी केली आहे.
यासंदर्भात बिरादार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रूपीनगर – तळवडे परिसरातील नाल्यांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. झाडांच्या फांद्या, वाढलेले गवत, चेंबरवर नसलेले झाकण, तर काही ठिकाणी टाकलेला मातीचा भराव यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाल्यात कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जमा होत आहे. नाल्यात अधिक प्रमाणात प्लास्टिक असल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. तसेच या नाल्यात सांडपाणी सोडण्यात येते असल्यामुळे येथे पाणी साचून दुर्गंधी येते. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी त्वरित प्रभाग क्र १२ मधील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची व सर्व नाल्यांची साफसफाई करून घेण्यात यावी अशी मागणी श्रीनिवास बिरादार यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group