पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये आज (दि.२७) रोजी दिवसभरात एकूण २२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये १२ पुरूष आणि १० महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण चऱ्होली, पिंपरी-भाटनगर, बौद्धनगर, किवळे, निगडी, पिंपळेगुरव, सांगवी, चिंचवड-आनंदनगर, काळेवाडी फाटा, बोपखेल या भागातील आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिलेले रुग्ण हे किवळे, संभाजीनगर, रुपीनगर, चिंचवड-आनंदनगर, रहाटणी, चिखली, पुण्यातील बोपोडी आणि कसबापेठ येथील रहिवासी आहेत.
गेल्या चार दिवसांपासून शहरात दररोज ३० हून अधिक कोरोना रुग्ण सापडत होते. पाचव्या दिवशी त्यामध्ये घट झाली आहे. आज शहरातील २२ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोना झालेल्या शहरातील रुग्णांची संख्या ४४६ झाली आहे. त्यातील १९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत वायसीएम आणि भोसरी येथील रुग्णालयात एकूण २२० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे चऱ्होली, पिंपरी-भाटनगर, बौद्धनगर, किवळे, निगडी, पिंपळेगुरव, सांगवी, चिंचवड-आनंदनगर, काळेवाडी फाटा, बोपखेल या भागातील आहेत.
आज शहरासाठी दिलासादायक बाब म्हणजे वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात उपचार सुरू असलेले २१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिलेले रुग्ण किवळे, संभाजीनगर, रुपीनगर, चिंचवड-आनंदनगर, रहाटणी, चिखली तसेच पुण्यातील बोपोडी आणि कसबापेठ येथील रहिवासी आहेत.
दरम्यान, आज शहराच्या कोणत्याही नवीन भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे शहरातील कोणताही भाग नव्याने सील करण्यात येणार नाही. शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे.























Join Our Whatsapp Group