पिंपरी (Pclive7.com):- समाजाची जबाबदारी घेणे हे केवळ सरकारचे कर्तव्य आहे, असा समाजात एक समज आहे. पण चिखलीतील साने आणि आर्वी तालुका जुन्नर येथील गाढवे परिवाराने कोरोनाच्या संकट काळात एक वेगळा आदर्श समाजात घालून दिला आहे.
चिखली गावातील स्थानिक धर्माजी साने यांचे चिरंजीव प्रवीण साने हे महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा शुभमंगल गाढवे परिवारातील कन्येशी पार पडला, पण कोरोना प्रादुर्भाव असल्याने लग्न समारंभाला मर्यादा आल्या होत्या. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला आपले काही देणे आहे, ही भावना जोपासणारे साने कुटुंबीय परतफेड करण्याच्या उद्देशाने काय करावे?या विचारात होते.
कोरोना संकटकाळात जनसामान्यांची होत असलेली परवड आणि वेदनांची अनुभूती प्रवीण साने स्वतः पोलीस दलात असल्याने होणे स्वाभाविक आहे. आणि मग त्यातूनच मुख्यमंत्री सहायता निधीचा एक लाखांची मदत करण्याचे साने परिवाराने निश्चित केले. त्यानुसार पिंपरी चिंचवड ममहापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांच्या पुढाकाराने मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश आज दोन्ही परिवारातर्फे सुपूर्द करण्यात आला. यावेळी साने कुटुंबीय आणि दत्ता साने यांची उपस्थिती होती.
सामाजिक जाणिवेतून अशा पद्धतीने कर्तव्य म्हणून जे ऋण आहे ते उतरविण्यासाठी अशा उपक्रमांचे कौतुक केले जाणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती असा जागरूक झाल्यास या देशातील समस्या संपायला वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया दत्ता काका साने यांनी दिली आहे.























Join Our Whatsapp Group