पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी ‘पुणे जिल्हा युवासेना समन्वयक सचिन सानप यांच्यावतीने कृष्णानगर, चिखली येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन सचिन सानप, गणेश सूर्यवंशी व डॉ. राकेश रसने यांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी गोपाल खुटवड, अमित थोरात, सत्यम चौगुले, सिध्देश मायभटे, अशनिल कोल्हे, प्रसाद सोनार, शिवानंद चौगुले, यशवंत कण्हेरे, बाबा देसाई, स्वप्निल खोत, सर्जेराव पाटील, विकी बोर, स्वप्नील कांबळे, श्वेता सूर्यवंशी, वैशाली खामकर, स्मिता चव्हाण, स्वराज्य ढोल पथक, झुंजार शिलेदार समिती, शिवराज्याभिषेक समिती व भोसरी विधानसभा विभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group