पिंपरी (Pclive7.com):- शिवराज्यभिषेक दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा निगडीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यमुनानगर श्री सातेरी देवी मंदिरात झालेल्या शिबिरामध्ये ७० जणांनी सहभाग घेतला.
या शिबीरास आमदार व भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, सद्यपरिस्थितीत आपल्या समाजासाठी व देशासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्त संकलन प्रमाण वाढविणे गरजचे आहे. हे लक्षात घेऊन रक्तदान शिबिराच्या माध्यमातून चांगले समाजोपयोगी काम होत आहे. या भागात कोरोनाच्या काळामध्ये तीन महिन्यांच्या कालावधीत उत्तम केंदळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेली कामे ही मदत न समजता स्वतःची समाजाप्रती असणारी कर्त्यव्य पार पाडताना दिसत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचे काहीतरी देणे यामुळे प्रत्येक संकटकाळी मग ते कालचे चक्रीवादळपण असो अशा वेळी मदत व सहकार्य करताना त्यांची तळमळ दिसून येते. त्यामुळे नगरसेवक उत्तम केंदळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन
नगरसेवक उत्तम केंदळे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व जण काम करत असताना ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे आम्हाला समाजात काम करताना काही अडचणी येत नाही. या शिबिरात पिंपरी सेरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट रक्तपेढी व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले.
या शिबिरासाठी नगरसेविका कोमल घोलप, जितू पवार, दिनेश यादव, युवा मोर्चाचे अध्यक्ष संकेत चोंधे, दीपक नागरगोजे, बापू घोलप, दिलीप पवार, ज्येष्ठ नागरिक गजानन ढमाले, सुभाष सराफ, गोरख कोलते, अमृत अबनावे, रमेश घोडेकर उपस्थित होते. भाजपचे बाबा परब, शेखर आसरकर, लक्ष्मीताई विर्डीकर, मेघा पोटफोडे, शिबिराचे नियोजन युवा मोर्चा मुक्ता गोसावी, अंजली पांडे, शर्मीली मेहेर, गौरी केंदळे यांनी केले, अशी माहिती केंदळे यांनी दिली.























Join Our Whatsapp Group