पिंपरी (Pclive7.com):- लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकार व राज्य सरकारने प्रायव्हेट फायनान्स बँकांना आदेश दिले आहेत. तरीही या फायनान्स कंपन्यांचे आधिकारी व कर्मचारी गोरगरिब जनतेला हप्त्यांसाठी वेठीस धरून पैसे भरण्याचा तगदा लावून धरत आहेत. शहरातील प्रायव्हेट फायनान्स बँकांनी गोरगरीबांचे पिळवणूक बंद न केल्यास पिंपरी चिंचवड शहरात मातोश्री सामाजिक संस्थेच्या वतीने त्या त्या ठिकाणच्या फायनान्स बँका विरोधात बार्शी पॅटर्न राबवू असा इशारा प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून गणेश आहेर यांनी दिला आहे.
यावेळी शहर उपाध्यक्ष गणेश पाडूळे, शहर कार्याध्यक्ष गोरख पाटील, शहरसंघटक रविकिरण घटकार, प्रदिप दळवी, माऊली जाधव, अंकूश कोळेकर, बाळासाहेब गायकवाड, निलेश भोरे, मारुती म्हस्के, जितेंद्र जूनेजा, दत्ता गिरी, गणेश वाळूंज, महेश गूळगोंडा, रामू चयंदास, जितेंद्र चौधरी, नारायण खूशलानी, ताराचंद क्रिपलानी, राहूल कदम आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group