पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचेे पिंपरी कॅम्प येथे जिजामाता रूग्णालय, मासुळकर कॉलनीतील रूग्णालय आणि आकुर्डीतील रूग्णालय बांधून तयार आहेत. मात्र, तेथे रूग्ण सेवा अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. या रूग्णालयासाठी आवश्यक डॉक्टर व तज्ज्ञांची नियुक्ती करून तेथे वैद्यकीय सेवा सुरू करावी, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.
उपमहापौर हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी रूग्णालय व बेडची संख्या कमी पडत आहे. महापालिकेची जिजामाता, मासुळकर कॉलनी व आकुर्डी हे 3 रूग्णालय बांधून तयार आहेत. तेथे वैद्यकीय मनुष्यबळाची नेमणूक करून ती रूग्णालये रूग्ण सेवेसाठी लवकरात लवकर सुरू करावी, असे उपमहापौर हिंगे यांनी म्हटले आहे.
तसेच, शहरातील खासगी रूग्णालयातील डॉक्टरांची मदत कोरोना रूग्णांवरील उपचारासाठी घेण्यात यावी. त्यामुळे महापालिका डॉक्टरांवरील ताण कमी होईल. त्याबाबत पालिका प्रशासनाने शहरातील खासगी डॉक्टरांशी चर्चा करावी. पालिका रूग्णालय व क्वारंटाईन सेंटरसाठी खासगी डॉक्टरांची सक्तीने नियुक्ती करावी, अशी मागणी ही उपमहापौर हिंगे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group