पिंपरी (Pclive7.com):- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये भक्ती-शक्ती चौकतील राष्ट्रध्वज न फडकवण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भक्ती शक्ती निगडी येथे १०७ मीटर उंचीचा वैशिष्ठयपूर्ण राष्ट्रीय ध्वज स्मारक स्वरूपात उभारला आहे. दि.०६ सप्टेंबर २०१८ रोजी महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार प्रतिवर्ष ०१ ऑक्टोबर ते ३१ मे या ८ महिने कालावधीमधे ध्वज फडकविण्यास मान्यता देणेत आलेली आहे. तथापी दि. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाळा असल्याने तसेच हवेचा उच्चदाब व प्रवाह यामुळे राष्ट्रध्वज वारंवार खराब होत असल्याकारणाने सदर कालावधीत हा राष्ट्रध्वज न फडकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी दि.१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १५ ऑगस्ट वगळून सदर वैशिष्ट्यपूर्ण राष्ट्रीय ध्वज स्मारक (Monumental Flag) फडकाविणेत येणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.























Join Our Whatsapp Group