पिंपरी (Pclive7.com):- चिंचवडमधील माजी नगरसेवकाला कोरोनाची लागण झाली आहे. भाजपच्या विद्यमान नगरसेविकेचे ते पती आहेत. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्यांची तपासणी केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहराच्या सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दररोज ७० ते ९० नवीन रुग्णांची भर पडत आहे. आजपर्यंत १३३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाविरोधात लढणा-या डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
चिंचवड विधानसभेतील एका माजी नगरसेवकाला आज कोरोनाची बाधा झाली आहे. भाजपच्या विद्यमान नगरसेविकेचे ते पती आहेत. त्रास होत असल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्यांची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, काही नगरसेवक, नगरसेवकांनीही कोरोनाची तपासणी करुन घेतली आहे. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.























Join Our Whatsapp Group