पिंपरी (Pclive7.com):- निगडी सेक्टर 22 येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील स्वागत कमानीचे काम मागच्या एक-दीड वर्षापासून सुरू आहे. हे काम खूप संथ गतीने सुरू असून ते रेंगाळले आहे. त्यामुळे या वसाहतीत, रुपीनगर, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी कडे जाणारा मुख्य मागील एक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे वसाहतीतील नागरिक, रुपीनगर मधील नागरिक यांना जाण्या-येण्या साठी देखील खूप त्रास सहन करावा लागत आहे. याच निगडी अमरधाम स्मशानभूमीत निगडी, आकुर्डी, काळभोरनगर, मोहन नगर, रामनगर येथील मुत्य झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्काराला अमरधाम स्मशानभूमीत जाण्यासाठी याच कमानीतून रस्ता होता. मात्र या कमानीच्या कामासाठी मागील एक वर्षापासून हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी जाताना एक किलोमीटर अंतर दुसर्या बाजुने वस्तीतून रस्ता काढत कसरत करत स्मशान भुमीत जावे लागते. त्यामुळे अनेक वेळा वाहतुकीचे कोंडी होऊन अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या कमानीचे काम जलद गतीने करून लवकरात लवकर रस्ता सुरू करावा या मागणीसाठी निगडीतील कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन केले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, सचिन काळभोर, स्वप्निल पवार, राजू शेख, राहुल येवले, पप्पू शहाणे, गणेश लुकर आदी सहभागी झाले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक सचिन चिखले यांनी आंदोलनस्थळी येऊन पुढील पंधरा दिवसात या कमानीचे काम जलद गतीने करून रस्ता खुला केला जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.























Join Our Whatsapp Group