पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच शहरात पिंपरी चिंचवड महिला बचत गटाच्या माध्यमातून भोसरी, मोशी, संतनगर, इंद्रायणीनगर, चिखली सेक्टर १ ते १६ या परिसरातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांचा ताजा सेंद्रिय शेतमाल, पाले भाज्या थेट दारापर्यंत उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सोमवारी दि.२९ जून रोजी या उपक्रमाचे उद्घाटन विद्यमान नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हनुमंत लांडगे, गीता महेंद्रु, छाया लांडगे, जयश्री लहरिया, आशा कावडे, निलेश कांबळे, काशीनाथ कांबळे, हेमंत खाडे, पिंपरी चिंचवड महिला बचत गटाच्या अध्यक्षा माधुरी गोडांबे, उपाध्यक्ष भाग्यलक्ष्मी नायर आदी मान्यवर उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group