पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (दि.०४) सकाळी चिंचवड येथील चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. साने यांना २५ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
दत्ता साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. २५ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.























Join Our Whatsapp Group