पिंपरी (Pclive7.com):- अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजयुमो पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या अध्यक्षतेखाली शरद पवार यांच्या निवासस्थानी २० हजार “जय श्रीराम” लिहीलेली पत्र पोस्ट करण्यात आली आहेत.
या प्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे, भाजयुमो प्रदेश चिटणीस अनुप मोरे, प्रदेश सदस्य जवाहर ढोरे, प्रभाग स्विकृत सदस्य दिनेश यादव, भाजयुमोचे भूषण गायके, साई कोंढरे, सुमित घाटे, राजेश राजपुरोहित, शिवराज लांडगे, उदय गायकवाड, प्रकाश चौधरी, पूजा आल्हाट, अभिजित बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अयोध्येत भव्य राम मंदिर भूमिपूजनाची तारीख जाहीर झाली. त्यानंतर “मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का..?” असं वक्तव्य महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं.
त्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी १० लाख “जय श्रीराम” लिहिलेले पत्र पाठविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने भाजयुमो पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष संकेत चोंधे यांच्या अध्यक्षतेखाली भाजयुमोच्या वतीने पवार साहेब यांच्या निवासस्थानी २० हजार “जय श्रीराम” लिहीलेली पत्र पोस्ट करण्यात आली.























Join Our Whatsapp Group