पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचे आज (दि.२४) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एकनाथ थोरात राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. २००७ मध्ये राष्ट्रवादीकडून ते महापालिकेत निवडून आले होते. त्यांनी कृष्णानगर भागाचे नेतृत्व केले होते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ते दुग्ध व्यवसायात कार्यरत होते.
गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आकुर्डीतील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी त्यांचे निधन झाले.























Join Our Whatsapp Group