पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतरही कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘वॉररूम’मध्येच कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वॉररूममधील एका डॉक्टर अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना कहर सुरू आहे. दिवसाला ५०० हून अधिक बाधित रूग्ण आढळत आहेत. शहरातील आमदार, नगरसेवक, पालिकेतील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. आतातर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉररूमध्येच कोरोनाने शिरकाव केला आहे.
वॉररूम मधील एका डॉक्टर अधिकाऱ्यांला कोरोनाची लागण झाली असून इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. संपूर्ण वॉररूम सॅनिटाईज केली जाईल अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.























Join Our Whatsapp Group