खेड (Pclive7.com):- खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती टोपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच सुनीता कड यांनी स्वखुशीने पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत सभागृहात सरपंच वैशाली जरे व ग्रामसेवक भंडारी भाऊसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रीया पार पडली.
उपसंरपच पदासाठी स्वाती संपत टोपे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची वाकी बुद्रुकच्या उपसंरपचपदी बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच वैशाली जरे यांनी घोषीत केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक भंडारी यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच वैशाली जरे, माजी सरपंच पप्पूदादा टोपे, माजी उपसरपंच विकास जाधव, सदस्य अण्णा गारगोटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कोरोना रोगाच्या वाढत्या संख्येमुळे निवडक लोकांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थिती मध्ये ही निवडणूक घेण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंच स्वाती टोपे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचे दर्शन घेतले. नवनिर्वाचित उपसरपंच स्वाती टोपे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी सरपंच वैशाली जरे, माजी सरपंच पप्पूदादा टोपे, माजी उपसरपंच विकास जाधव, माजी उपसरपंच सुनीता कड, ग्रा. पं. सदस्य अण्णा गारगोटे, ग्रा.पं.सदस्या राजश्री टोपे, ग्रा.पं. सदस्या कावेरी टोपे, ग्रा.पं. सदस्या रेखा टोपे, मनसे नेते विश्वास टोपे, पोलीस पाटील दत्तात्रय टोपे, आकाशगंगा इंटरनॅशनल स्कुल चे डायरेक्टर गंगाराम टोपे, तंटामुक्ती अध्यक्ष दिपक टोपे, ग्रा.पं. कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group