पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण जगातील सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीतही डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल आकुर्डीने अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली आहे.
कोविड -19 या साथीच्या रोगामुळे आज संपूर्ण देश लॉकडाऊन अवस्थेत आहे. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल,आकुर्डीच्या 11 ट्रेनींग व प्लेसमेन्टच्या ऑफिर्सने विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न केले. लॉकडाऊन दरम्यान इंजिनीरिंग, फार्मसी, पॉलिटेक्नीक मधील विद्यार्थ्यांची ऑनलाईन व्हिडियो कॉन्फरंसिंगद्वारे मुलाखती होऊन बायजूस, जयश्री पॉलीमर्स, व्हॅरोक इंजिनीरिंग, सिग्मा इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चरिंग, असेंट्रिक रिसर्च, उनो मिंडा, व्होडाफोन- आयडीया या विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली. अशा लॉकडाउन परिस्थितीत ही विद्यार्थ्यांना 10 सर्वाधिक लाखाचे पॅकेज मिळाले आहे. लॉकडाउन कालावधी मध्ये पीजीडीएमच्या विद्यार्थ्यांना रोजगारास पात्र करण्यासाठी Virtual Internship देण्यात आल्या.
डॉ. डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुल, आकुर्डी अंतर्गत ११ विविध महाविद्यालयातून मुले शिक्षण घेत आहेत. या शैक्षणिक संकुलात उत्कृष्ट दर्जाच्या प्रयोग शाळा,वर्ल्ड क्लास इंफ्रा व इतर पायाभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. कॅम्पसमधील माजी विद्यार्थी वेबिनार आयोजन करून कोविड परिस्थितीतीमुळे उद्योगात होणाऱ्या बदला विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देत आहेत. कुशल, तज्ञ प्राध्यापक वर्ग संस्थेत कार्यरत असून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम व अभ्यासक्रम उपक्रमामध्ये सक्रिय भाग घेण्यास प्रोत्साहन देत आहेत. संकुलातील विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेळोवेळी प्रशस्ती पत्रक दिले जाते. आरपीजी फौंडेशन आणि झेन्सार यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या रोजगार कौशल्य विभागाच्या पुढाकाराने तृतीय वर्षीच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सध्याच्या उद्योगाच्या निकषांनुसार दिले जाते. व्यवहारिक प्रदर्शनाठी कॅम्पसमध्ये ४०० पेक्षा जास्त सामंजस्य करार नामांकित कंपन्यांसोबत केले आहेत. मागील वर्षी विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये १००० हून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. प्रत्येक वर्षी २०० हुन अधिक राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या कॅम्पस मुलाखती साठी येतात.
या कामगिरीसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी.पाटील, ट्रस्टी तेजस सतेज पाटील, कॅम्पस संचालक कर्नल(नि) एस. के.जोशी, प्राचार्य डॉ. विजय वधाई आणि डॉ. ए.व्ही. पाटील, डॉ. नीरज व्यवहारे, प्रा. अरविंद कोंडेकर , डॉ.के. निर्मला, प्लेसमेंट्स विभागाच्या डीन डॉ. जस्मिता कौर व संपूर्ण विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.






















Join Our Whatsapp Group