मुंबई (Pclive7.com):- अनलॉकचा तिसरा टप्पा जाहीर करताना केंद्र सरकारनं जीम आणि व्यायामशाळा खुल्या करण्याच्या सूचना केल्या असल्या तरी राज्यातील परिस्थिती पाहून येथील इनडोअर जीम आणि व्यायामशाळा बंदच राहणार आहेत, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.
केंद्र सरकारने बुधवारी ‘अनलॉक तीन’बाबत नवीन गाइडलाइन्स जारी केल्या. या गाइडलाइन्स विचारात घेऊन राज्य सरकारनंही मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन राहणार असून कंटेनमेंट झोनमध्ये पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू असतील. मात्र, इतर ठिकाणी काही अधिकच्या सवलती देण्यात आल्या आहेत.
केंद्राच्या गाइडलाइन्समध्ये जीम व व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातही त्या सुरू राहणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, राज्य सरकारने याबाबत तातडीने खुलासा केला आहे. राज्यात केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून ५ ऑगस्टपासून परवानगी असेल. इनडोअर जीम, व्यायामशाळा बंदच राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहेत.




















Join Our Whatsapp Group