पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा पदाचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी पक्षातील इच्छुक नगरसेवकांचे अर्ज मागविले आहेत.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते काटे यांचा कार्यकाळ नुकताच संपत आहे. त्यामुळे २०२०-२१ या वर्षात विरोधी पक्षनेते पदाचा लाभ अन्य इच्छुकांना मिळणार आहे. यासंबंधीत तातडीने इच्छुकांचे अर्ज मागवून घेऊन निवड प्रक्रिया राबवावी, असे आदेश राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांना दिले आहेत.
त्यानुसार संजोग वाघेरे पाटील यांनी पक्षाच्या नगरसेवकांना अर्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवार दि.१० ते बुधवार दि.१२ ऑगस्ट दरम्यान खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जांच्या छानणीनंतर सक्षम नगरसेवकाची या पदावर निवड केली जाणार आहे, अशी माहिती संजोग वाघेरे पाटील यांनी दिली आहे.























Join Our Whatsapp Group