पिंपरी (Pclive7.com):- कोरोना आजारावर उपचारासाठी अत्यंत प्रभावी ठरत असलेला प्लाझ्मा दान करण्याऱ्या जीवनदात्यांसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून प्रत्येकी १ हजार रुपये ‘जीवनदाता’ प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. दि.९ ऑगस्ट पासून म्हणजेच भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन व क्रांती दिन यांचे औचित्य साधत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याबाबत युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले की, सध्या जीवघेण्या कोरोनावर प्लाझ्मा थेरपीने उपचारांना यश मिळत आहे. त्यामुळे अधिकाधिक रूग्णांचे प्राण वाचावे यासाठी प्लाझ्मा दान करणाऱ्या प्रत्येक जीवनदात्यास १ हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देणार आहोत. उपाचारानंतर बरे झालेल्या नागरिकांनी इतर नागरिकांसाठी पुढे यावे व प्लाझ्मा दान करावा. तसेच प्रोत्साहन निधीसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकत्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना याबाबतचे पत्र देऊन उपक्रमाची माहिती कळविली आहे.























Join Our Whatsapp Group