वाकड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता व गणेश विसर्जन घाटावरील धोका ओळखुन माजी नगरसेवक विनायक गायकवाड व स्थायी समितीच्या माजी सभापती विद्यमान नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड यांच्या माध्यमातून विनायक गायकवाड युथ फाऊंडेशनतर्फे वाकड परिसरात ठिकठिकाणी गणेश विसर्जन हौद तयार करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी नदी घाटावर गर्दी न करण्याचे आवाहन माजी नगरसेवक विनायक गायकवाड व स्थायी समितीच्या माजी सभापती विद्यमान नगरसेविका सौ. ममताताई विनायक गायकवाड यांनी केले आहे. वाकडमधील युरो स्कुल शेजारी, पिंक सिटी रोड./ग्लोबल पंजाब हॉटेल शेजारी, पिंक सिटी रोड/पिझ्झा हट शेजारी, उत्कर्ष चौक/छत्रपती चौक कस्पटेवस्ती या ठिकाणी गणेश विसर्जन हौद तयार करण्यात आलेले आहे.
विनायक गायकवाड व नगरसेविका ममताताई विनायक गायकवाड यांनी वाकड परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन केलेले आहे कि, नागरिकांनी गणेश विसर्जनाकरिता घाटावर गर्दी न करता ठिकठिकाणी गणेश विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. याठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून नागरिक व सोसायटीधारकांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करावे.






















Join Our Whatsapp Group