पिंपरी (Pclive7.com):- तब्बल ७२ सदस्य असलेली भाजपची सांगवी – काळेवाडी मंडलची नवी जम्बो कार्यकारिणी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी जाहिर केली. मंडल अध्यक्ष विनोद तापकीर यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
चिंचवड विधानसभा मतदार संघातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी या भागाचा या कार्यकारणीत समावेश असून, आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
सांगवी – काळेवाडी मंडल अध्यक्ष विनोद तापकीर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी खालील प्रमाणे –
मंडल अध्यक्ष – विनोद तापकीर, संघटन सरचिटणीस – सुरेश पाटील, सरचिटणीस – दीपक जाधव, भरत टाकुर, शिवाजी कदम, चिटणीस भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब येडे, गुरुदेव कुंभार, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, देविदास हरिदास शेलार, अतुल पवार, अंबादास पडळकर, कार्याध्यक्ष – माधवराव मनोरे, युवा मोर्चा अध्यक्ष – देविदास तांबे, सरचिटणीस – मनोज नखाते, पुष्कर पाटील, जितेंद्र धर्मा पवार, चिटणीस – सखाराम हुलावळे, पांडुरंग कोरके, शरद दिसले, उपाध्यक्ष – आदित्य मस्के, आकाश भारती, दत्ता येणपुरे, अभिषेक ओझा, महिला आघाडी अध्यक्ष – विमलताई काळे, संघटन सरचिटणीस – अनिताताई शिंदे, सरचिटणीस – कल्पना काकूंद्रे, राणीताई आदियाल, रेखाताई काटे, उपाध्यक्ष – सीमाताई पाटोळे, सोनलिताई शिंपी, चिटणीस – नणंदाताई कापरे, उज्वला ताई पांढरे, आशाताई तटले, अनुसूचित जाती पुरुष अध्यक्ष – प्रेमसागर खरे, उत्तर भारतीय अध्यक्ष – सुखलाल भारती, कामगार आघाडी अध्यक्ष – हनुमंत सुतार, दक्षिण भारतीय अध्यक्ष – कार्तिक कृष्णन, ओबीसी अध्यक्ष – संभाजी नढे, शिक्षण आघाडी अध्यक्ष – सुजित देसाई, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष – डॉ.निलेश वाघमारे, वकील आघाडी अध्यक्ष – हर्षद नढे, व्यापारी आघाडी अध्यक्ष – शांताराम पाटील, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष – पिरपाशा जमादार, ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष – गणेश भोसले, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष – सचिन कांबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, स्वीकृत सदस्य महेश जगताप, संदीप नखाते, संदीप गाडे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापूरे, महिला सरचिटणीस पुष्पा सुबन्द, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल नढे, युवा उद्योजक नवीन तापकीर व भारतीय जनता पार्टीचे सर्व सभासद व सांगवी – काळेवाडी मंडल मधील सर्व अधिकारी, पदाधिकारी बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group