पिंपरी (Pclive7.com):- कोरोनामुक्त पिंपळे सौदागर – रहाटणीचा निर्धार करत भाजपाकडून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ आज (दि.२०) करण्यात आला. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या सहकार्याने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर – रहाटणी प्रभाग ‘कोरोनामुक्त’ करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. येथील प्रत्येक नागरिकांची तपासणी यात करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही फार महत्वाचा आहे.
त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा विचार करून, या मोहिमेत एकत्रितपणे सहभागी व्हा. सर्व लोकप्रतिनिधी, नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सामाजिक बांधिलकी म्हणुन पुढे येऊन कोणताही संकोच न ठेवता, भीती न बाळगता तपासणीसाठी सहकार्य करा. या आरोग्य मोहिमेत सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होण्याची गरज आहे.
कोरोनाचे संकट वाढत असताना रहाटणी, पिंपळे सौदागर येथील जनतेचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महानगरपालिका व प्रभागातील नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे नगरसेविका निर्मलाताई कुटे प्रयत्नशील आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण सर्व सुविधा उभारत आहोत. लॉकडाऊन काळात आपण ही कोरोनाची लाट थोपविली होती. मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनासह अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही.
वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागेल. यासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल. पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, ॲटीजेन किट, घरातील प्रत्येक व्यक्तीची अँपमध्ये नोंदणी होणार आहे. इन्फ्रारेड थर्मामिटरने तापमानाची नोंद करणार आहेत. प्लस ऑक्सिमिटरने पातळी मोजली जाणार आहे. आदी अत्यावश्यक साहित्य तसेच मदत उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न (बापु)काटे, नगरसेविका सौ. निर्मलाताई कुटे, भाजपा चिंचवड विधानसभा अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे, उन्नती सोशल फाउंडेशन श्री.संजय भिसे, श्री. संजय कुटे, डॉ.प्रफुल्ल तपशाळकर, नर्स सौ.पुनम उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group