पिंपरी (Pclive7.com):- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. दिवसेंदिवस तरूणांचा कल राज ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे वळताना दिसत आहे. भोसरी विधानसभेतील कार्यकर्त्यांनी आज मोठ्या संख्येये मनसेत जाहिर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यास सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते.
पिंपरी चिंचवडचे मनसेचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीवर विशेष लक्ष दिले आहे. सचिन चिखले यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत भोसरीतील तरूणांनी मोठ्या संख्येने आज पक्ष प्रवेश केला.
भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश घेण्यात आला. शहराध्यक्ष चिखले आणि अंकुश तापकीर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले.
मनसेमध्ये प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते पुढील प्रमाणे :- रोहित गिरी, बालाजी पालकर, अमोल आधव, जेम्स बनसोडे, राहुल गायकवाड, शिवम शिंदे, गणेश सावळे, विठ्ठल ढोणे, रोहित जाधव, गणेश बडे, श्रीकांत पोळ, संजय फटांगरे, सुनिल खंदारे, धनंजय सोळंकी, राकेश इंगळे, आकाश जाधव, अजय सावंत, कृष्णा पिंगळे, महादेव पिंगळे, तुषार चव्हाण, भारत क्षेत्रे, निलेश ननावरे, प्रतीक पाटील, प्रथमेश भेंडे, किरण बिन्नर, सावता राऊत, अनंताभाऊ इंगळे, ऋषिकेश रोळे, एकनाथ डोंगरे, योगेश मोरे, महादेव ढेंबरे, योगेश चंदन, गौरव इंगळे, राजेश माटे, अथर्व डोंगरे, गोविंद परांडे, मंगेश जाधव, सचिन धोंडगे, तुकाराम सोमवंशी, सुनील राठोड आदींनी मनसेत जाहिर प्रवेश केला.






















Join Our Whatsapp Group