पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने नव महाराष्ट्र विद्यालय येथील क्रीडांगणाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या दुरूस्तीचे काम स्वखर्चाने करण्यात येणार आहे.
यासंदर्भात बोलताना संदीप वाघेरे म्हणाले की, पिंपरी परिसरामध्ये क्रिकेटप्रेमी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नव महाराष्ट्र विद्यालयाचे क्रीडांगण म्हणजे क्रिकेटप्रेमींची जनु पंढरीच आहे. हीच बाब लक्षात घेऊन संदीप वाघेरे हे गेली ३ वर्षे सात्यत्याने खेळाडूंसाठी मैदनाची दुरुस्तीची कामे स्वखर्चाने करत आहे.
पिंपरी परिसरातील खेळाडु क्रिडा सुविधांपासून वंचित राहु नये म्हणून वाघेरे स्वत: लक्ष घालुन मैदाने दुरुस्तीची कामे करित आहे. पिंपरी प्रभाग क्र.२१ मध्ये पवनेश्वर मंदिराजवळ महात्मा फुले क्रिडा संकुलाचे काम महापालिकेमार्फत हाती घेण्यात आले असून सदर ठिकाणी कबड्डी, खो-खो अशा पद्धतीच्या राष्ट्रीय खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे.
तसेच पिंपरीगांव ते पिंपळे सौदागार दरम्यानच्या पुलाजवळील आरक्षण क्र. १७३ मध्ये ऑलिंपिक खेळाचे मैदान तयार करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील सर्व खेळाडूंना याचा लाभ घेता येणार असल्याचेही संदीप वाघेरे यांनी नमुद केले.


















Join Our Whatsapp Group