पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते, माजी महापौर मंगला कदम यांचे चिरंजीव कुशाग्र कदम यांनी त्यांचा वाढदिवस यावर्षी सामाजिक बांधिलकी जपून साजरा केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून जनजागृती तसेच संभाजीनगर, शाहुनगर प्रभागातील तब्बल ५०० जेष्ठ नागरिकांना वाफेचे भांडे (स्टिमर) वाटप केले आहे.
चिंचवड, संभाजीनगर येथील कुशाग्र युथ फाऊंडेशचे अध्यक्ष कुशाग्र कदम यांच्या मित्र परिवारानी शहरातील कोरोना विषाणू संसर्गांच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले. सामाजिक भान राखत कोरोना साथ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक १० संभाजीनगर, शाहूनगर परीसरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन कोरोना साथीबाबत जनजागृती व कोरोनाबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत नागरीकांचे प्रबोधन केले.
नागरीकांसाठी कोरोना या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच प्रमाणे खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नृत्यस्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षीस वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी घरातूनच सहभाग नोंदविला होता. तसेच इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तम गुण मिळविणा-या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करुन त्यांची महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी फाईल फोल्डर भेट म्हणून देण्यात आले. त्याच प्रमाणे परीसरातील ५०० ज्येष्ठ नागरीकांना कोरोना विषाणू संसर्गांबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत प्रबोधन करुन त्यांना वाफेचे भांडे (स्टिमर) भेट देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवानेते कुशाग्र कदम यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.



















Join Our Whatsapp Group