पिंपरी (Pclive7.com):- प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वनिधी योजनेचा जास्तीत-जास्त पथविक्रेत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.
प्रधानमंत्री पथविक्रेता (फेरीवाला) आत्मनिर्भर स्वनिधी योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरवस्ती विकास योजना विभागाच्यावतीने कुदळवाडी येथे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयात कर्ज मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. या उपक्रमांची सुरूवात आमदार लांडगे यांच्याहस्ते करण्यात आली. त्यावेळी लांडगे बोलत होते.
ज्या विक्रेत्यांकडे दुकानाचे परवाने नाहीत अशा विक्रेत्यांचे नगर पथविक्रेता शिफारस पत्र मिळणेबाबत कर्ज मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे हातगाडी व स्टॉलचे लायसन्स आहेत अशा विक्रेत्यांचे पूर्ण अर्ज भरून घेतले जात असून सदर योजनेविषयी मार्गदर्शन केले जात आहे, अशी माहिती स्वीकृत नगसेवक दिनेश यादव यांनी दिली.






















Join Our Whatsapp Group