पिंपरी (Pclive7.com):- पत्नीचा छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवडचा ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळख असलेल्या सनी वाघचौरे याच्यासह कुटुंबातील चारजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार २३ मार्च २०११ ते २२ ऑक्टोंबर २०२० दरम्यान संतोषी माता मंदीर चौक, नेहरूनगर येथे घडला. गोल्डमैन सनी नाना वाघचौरे (वय ३१), सासू आशा नाना बाघचारे (वय ५६), नाना वाघचौरे (वय ६०), नणंद निता गायकवाड (वय ३६, सर्व रा . संतोषीमाता मंदीरचौक, मंदीरमागे, नेहरुनगर, पिंपरी पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पीडित विवाहितेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डमॅन सनी वाघचौरे आणि सासरच्या लोकांनी संगणमत करुन पीडितेच्या आईवडीलांकडे गृहोपयोगी वस्तुंची मागणी केली. पती सनीचे बाहेरील स्त्रियांशी संबध आहेत. याचा जाब विचारला असता त्याने पत्नीस मारहाण व शिवीगाळ करुन धमकी दिली. त्यांना गर्भपाताची औषधे देवुन गर्भपात घडवून आणला. यासाठी पीडितेचा शारिरीक व मानसिक छळ केला, असे आरोप पीडितेने तक्रारी अर्जात केले आहेत. अधिक तपास चिंचवड पोलिस करत आहेत.






















Join Our Whatsapp Group