पिंपरी (Pclive7.com):- लाॅकडाऊनच्या काळामध्ये कोरोना महामारीच्या विरोधात पोलीसांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याबद्दल पोलीस फ्रेंन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना “कोविड-१९ योद्धा” सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, क्राईमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी व पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे
तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखिल येवले, हवेली तालुका उपाध्यक्ष पंकज पवार, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष हरीराम जठार, मोशी-इंद्रायणी नगर विभाग महिला अध्यक्षा शितल आल्हाट, मोशी विभाग अध्यक्ष शाम मार्के, विनायक येवले, मोशी विभाग उपाध्यक्ष सुनील सावंत, मोशी विभाग कार्याध्यक्ष संदीप पाटिल, मोशी विभाग सहसचिव राकेश यादव व सूरज इंगोले,सुधा खोले, प्रतीक्षा ताजणे, ऋचा आल्हाट, समृद्धी आल्हाट, आदित्य ताजणे आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group