मुंबई (Pclive7.com):- समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज रोजी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची भेट घेतली. यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबात चर्चा केली. व संजीवनी पांडे यांनी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबत अडचणी कथन केल्या. त्यानंतर राज्यपाल महोदयांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी राज्यपालांना सांगितल्या.
यावेळी मकरंद कुलकर्णी यांनी राज्य सरकारशी आज पर्यंत झालेला पत्रव्यवहार व आजची स्थिती कथन केली. तसेच ॲड.आरती सदावर्ते – पुरंदरे यांनी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या संरक्षणासाठी कडक कायदे करावे असेही म्हटले.
यावेळी राज्यपालांनी सगळ्या अडचणी ऐकून घेऊन तसेच सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले.






















Join Our Whatsapp Group