पिंपरी (Pclive7.com):- औंध जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गेल्या तीन-चार महिन्यापासून कोरोनाच्या काळात वास्तव्यास असणाऱ्या भटकंती करून शेळ्या मेंढ्या पाळणारे मेंढपाळ अत्यंत बिकट अवस्थेत जिवन जगत होते .त्यांना शासनाची कोणतीही मदत मिळाली नाही. आपण सर्वजण दिवाळी असो किंवा अन्य धार्मिक सण, आनंदाने आपल्या घरी साजरे करत आसतो. याला अपवाद आहेत मेंढपाळ. थंडीच्या दिवसात ही उघड्यावर प्रपंच थाटुन उघड्यावर झोपतात व स्वयंपाक ही उघड्यावर करतात. अनेकदा त्यांना भटक्या कुत्र्यांचा व गावगुडांच्या त्रासाला समोरे जावे लागते. त्यांची मुलेही शिक्षणाच्या अभावामुळे मुख्य प्रवाहा पासून वंचित राहतात.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या माध्यमातून दरवर्षी गेल्या दहा वर्षापासून वेगवेगळ्या अनाथ आश्रमात व अंधकल्याण केंद्रात जाउन त्यांना जेवण, फराळ व कपडे देत आसतो. यावर्षीही त्यांच्या बरोबरच भटकंती करणाऱ्या मेंढपाळ व त्यांच्या कुटुंबाची फराळ व लहान मुलांना प्रत्येकी दोनदोन नवीन कपडे, भगिनींना तीन नवीन साड्या देऊन त्यांची दिवाळी साजरी केली.
आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि आपण ते दिले पाहिजे. या मानवतेच्या दृष्टिकोनातून तेथील लहान मोठ्या पंधरा मुला-मुलीना व भगिनींना नवीन साड्या व कपडे दिले. त्याचबरोबर फराळ देऊन त्यांचा दिवाळी सण गोड केला. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचीच खरी दिवाळी साजरी झाल्याचे समाधान मिळाले असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी जोगदंड यांनी सांगितले की आपल्या उपनगरात काही ठिकाणी मेंढपाळ असतील तर आम्हाला कळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विकास कुचेकर म्हणाले की, नागरीकांनी आपआपल्या भागातील वास्तव्यास असलेल्या मेंढपाळास दिवाळीच्या सणासाठी मदत करुन सामाजिक बांधिलकीची माणूस की दाखवावी.
७० वर्षीय तांबे म्हणाले, आज तुमच्यामुळे आमच्या कुटुंबाची दिवाळी गोड झाली. तुम्ही आमच्या लेकराचे मायबाप झालात त्यांचे डोळ्यातुन अश्रू आले. आमच्या वेदना तुम्हाला कळल्या पण एसीत खुर्चीत बसलेल्या मायबाप सरकारला का दिसत नाही? असा प्रश्न त्यांनी आम्हाला विचाराला तेव्हा आम्ही सर्व जन निःस्तद्ध झालो व आम्हाला आमच्या गरीबीची जाणीव झाली.
मीना करंजावणे म्हणाल्या कि, तज्ञांच्या मते एक नागगोळी पेटवली तीन हजार सिगारेट ओडल्यासारखे, एक हजार लवंगी पेटवली तर सतराशे सिगारेट ओढल्यासारखे, तर एक भुईचक्कर पेटवल्यास दोन हजार सिगारेट ओडल्यासारखे आहे. त्यामुळे फटाके न वाजवण्याचे त्यांनी नागरिकांना आव्हान केले.
यावेळी संस्थापक विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, मुळशी विभाग प्रमुख मिनाताई करंजावणे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश मोरे, आळंदी सचिव रवी भेंकी, अँड सचिन काळे, गजानन धाराशिवकर, धनंजय महाले आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group