पुणे (Pclive7.com):- पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात एक ठार तर १५ जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
हा अपघात आज मध्यरात्री दोनच्या सुमारास झाला. अपघातग्रस्त बस सातारा येथून मुंबईच्या दिशेनं येत होती. पनवेल एक्झिटजवळ असताना एका अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेत बसचा एका बाजूचा पत्रा कापला गेला. त्यामुळं १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातात मृत झालेली व्यक्ती मुंबईतील असून बेस्ट कर्मचारी असल्याचं समजतं. अपघाताची माहिती मिळताच आयआरबीची यंत्रण व महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.






















Join Our Whatsapp Group