पिंपरी (Pclive7.com):- राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोशी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराला दात्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मोशी येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. रविवारी (दि.१३) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात परिसरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित रक्तदान केले.
यावेळी बोलताना अतिश बारणे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनला प्रतिसाद देत आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविला. परिसरातील नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. यापुढेही समाजाच्या हिताचे उपक्रम राबविले जातील. राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोशी परिसरातील नागरिकांच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचेही बारणे म्हणाले.



















Join Our Whatsapp Group