पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नागरीकांसाठी मोफत “हृदयरोग तपासणी शिबीर” विशालनगर, पिंपळे निलख येथे संपन्न झाले.
कै.ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठानच्यावतीने दि.१० फेब्रुवारी रोजी चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉप्लेक्स विशालनगर, पिंपळे निलख येथे “हृदयरोग तपासणी” शिबीर आयोजीत करण्यात आले होते. यावेळी रूबी एलकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमीटेड तर्फे तज्ञ डॉक्टर व त्यांच्या टिमकडून प्रभागातील नागरीकांची तपासणी करण्यात आली.
प्रभागातील अनेक नागरिकांनी या “हृदयरोग तपासणी” शिबीरास भेट दिली व स्वत:हाची तपासणी करून घेतली.
यावेळी विशालनगर पिंपळे निलखच्या नगरसेविका आरतीताई चोंधे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, पवन प्रकाश कामठे, विजयजी चव्हाण, वामिनी जैन, विक्रांत गंगावणे, सौ.प्रियांका शाह सिंह, अमित सुतार व आदी उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group