अध्यक्षपदी राजन चिटणीस यांची तर, सचिवपदी चंद्रशेखर कुदळे यांची निवड
पिंपरी (Pclive7.com):- ॲथलेटिक्स असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवड सिटीच्या अध्यक्षपदी राजन चिटणीस यांची तर, सचिवपदी चंद्रशेखर कुदळे आणि मनीषा जाधव यांची खजिनदार पदी निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने नुकतीच पिंपरीत बैठक झाली. त्यात कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांचा कालावधी २०२१ ते २०२५ असा राहील.
कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: राजन चिटणीस – अध्यक्ष, किशोर शिंदे – कार्याध्यक्ष, चंद्रकांत पाटील, गणेश कुदळे – सह कार्याध्यक्ष, मधू देसाई-वरिष्ठ उपाध्यक्ष, रामदास कुदळे, विष्णू कुदळे – उपाध्यक्ष, चंद्रशेखर कुदळे – सचिव, शशी लांडगे – वरिष्ठ सहसचिव, उमेश जाधव, ॲड. पौर्णिमा जाधव – सहसचिव, मनीषा जाधव -खजिनदार, अन्वर शेख, प्रमोद मोरे – सह खजिनदार, निवृत्ती काळभोर, चंद्रशेखर कुलकर्णी, मंगेश पवार – कार्यकारिणी सदस्य.






















Join Our Whatsapp Group